भारत देश ज्याचा इतिहास संस्कृती परंपरा या अतिशय उच्च व प्रगल्भ अवस्थेत आहेत. याची प्रचिती आपणास आहेकी प्रसंगी येत असते. या देशात २००० वर्ष पूर्व "चक्रवर्ती सम्राट " "त्रिसमुद्धदिश्वर " असा खास बिरुदावली असलेले राजे व राजवटी होत्या. तक्षशिला व पाटलीपुत्र अशा अनेक विश्व विद्यापीठ त्यांनी स्थापित केल्या. विविध कला, विज्ञान, भाषा साहित्य ज्यांची जोपासना येथे झाली. इतिहासाच्या खुणा त्याची साक्ष देतात. अजंठा-वेरुळ, विजयनगर खजुराहो अशी असंख्य स्थळे अखंड भारत भर लेह लडाख, सौराष्ट्र, केरळ अरुणाचल " असेतू हिमाचल, भारताला "निसर्गाचे देणे" लाभले आहे, पृथ्वीवर भारत देश "अद्वितीय आहे" "अवर्णनीय आहे". खरे तर निसर्ग हाच या भूमी व या वरील विविध मानवीय अविष्काराचा जनक सृजक.
हे सर्व विश्व व्यापक आहे म्हणून आपण या भूमीचे व निसर्गाचे ऋणी आहोत हे आपणास भूषणावह आहे.
अधिक माहिती अथवा आमच्याशी संपर्क साधण्यासाठी खालील फॉर्म भरा